शिक्षण

देश अपनाएं सहयोग फाउंडेशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा

मुंबई : सजग, जाणकार आणि सक्रिय नागरिक अर्थात एक्टिझेन्स बनण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचा गौरव केला जावा यासाठी देश अपनाएं सहयोग फाउंडेशनने वार्षिक पुरस्कार समारोहाचे आयोजन केले होते. फिलांथ्रोपिस्ट व लेखिका श्रीमती रोहिणी निलेकणी यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. देश अपनाएं सहयोग फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर पुरस्कार सोहळ्याचे थेट आयोजन करण्यात आले होते.

चॅम्पियन स्कूल्स अवॉर्ड या दहा शाळांना देण्यात आले – अगुरचंद मनमुल जैन स्कूल, चेन्नई, डीसीएम प्रेसिडेन्सी स्कूल, लुधियाना, एचव्हीबी ग्लोबल अकॅडेमी, मुंबई, नर्मदा कॅलोर्क्स पब्लिक स्कूल, भरूच, अवर लेडी ऑफ द रोजरी हायस्कूल, गोवा, पवार पब्लिक स्कूल, डोंबिवली, श्री प्रज्ञा पब्लिक स्कूल, अजमेर, श्रीमती चंदाबाई पगारिया जैन मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल, चेन्नई, सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी स्कूल, मुंबई आणि द पीएसबीबी मिलेनियम स्कूल, चेन्नई.

२० शिक्षकांना चॅम्पियन टीचर्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. सर्वाधिक सक्रिय देश अपनाएं सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

देश अपनाएं सहयोग फाउंडेशनची स्थापना २०१५ साली श्री. वल्लभ भंशाली आणि त्यांच्या सहयोग्यांनी केली. जगातील सर्वात महान लोकशाही म्हणून भारताची जडणघडण करू शकतील अशा असामान्य नागरिकांच्या विचार व कृतींना आकार देणे हे देश अपनाएं सहयोग फाउंडेशनचे लक्ष्य आहे.

देश अपनाएं सहयोग फाउंडेशनचे (आणि द एनाम ग्रुपचे) संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक श्री. वल्लभ भंशाली यांनी या उपक्रमाविषयी सांगितले, “लोकशाही २.० प्रत्यक्षात साकार व्हावी यासाठी चळवळ निर्माण केली जावी हे देश अपनाएंचे उद्धिष्ट आहे. लोकशाही २.० म्हणजे ज्यामध्ये नागरिक केवळ बघे म्हणून न राहता एक्टिझेन्स बनतात, अर्थात ते शांतता, स्वच्छता, कार्यक्षमता, प्रगतिशीलता इत्यादी सामूहिक अधिकारांचे पुरेपूर पालन करतात आणि त्यांना समजते की व्यक्तिगत अधिकारांना खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवण्यासाठी हे सामूहिक अधिकार महत्त्वाचे आहेत. हे साध्य करण्यासाठी आपल्याला मुलांना हे शिकवणे आवश्यक आहे की लोकशाहीचे जास्तीत जास्त लाभ मिळावेत यासाठी लोकशाहीचे दररोज पालन केले पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जाणकार सहभाग हा पाया आहे. देश अपनाएंला आनंद होत आहे की आमच्या प्रयत्नांतून थोड्याफार प्रमाणात बदल घडून येत आहेत, नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून युवा पिढीला प्रेरित केले जात आहे जेणेकरून त्यांच्या भविष्यावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण राहू शकेल, ही क्रांती घडून येण्यासाठी सज्ज असलेल्या प्रगतिशील शाळांसोबत दीर्घकालीन भागीदारी देखील यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. आम्हाला जाणीव आहे की हा नेहमीच एक छोटा उपक्रम राहील जो नेतृत्व करेल – मग ती शाळा असो, शिक्षक, पालक किंवा विद्यार्थी असोत. दरवर्षी अधिकाधिक नेते आमच्या उपक्रमात सहभागी होत आहेत.”

प्रमुख पाहुण्या श्रीमती रोहिणी निलेकणी म्हणाल्या, “नागरिक म्हणून जर आपण सक्रिय राहणार नसू तर जनशक्तीमधून लाभ मिळण्याच्या ऐवजी लोकसंख्या हीच एक मोठी समस्या बनेल. मी युवकांना असे सांगू इच्छिते की, त्यांनी आपली जिज्ञासा कायम जागृत ठेवावी, एकमेकांशी, समाजाशी जोडलेले राहावे, वचनबद्ध राहावे आणि संवेदनशीलता, सहानुभूती बाळगावी. तुम्हाला ज्यांच्याबद्दल काळजी वाटते अशा मुद्द्यांवर माहिती मिळवा आणि विनम्रतेने, कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय, स्वतः चिंतन, विचार करून त्यामध्ये सहभागी व्हा. तुम्ही एक छोटी सुरुवात करू शकता. लक्षात ठेवा, अयशस्वी व्हावे लागले तरी काहीच हरकत नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button