Top Newsस्पोर्ट्स

दीपिका-रणवीर ३००० कोटी मोजून आयपीएलचा नवीन संघ खरेदी करणार

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL) १५ व्या हंगामात १० संघ दिसणार आहेत. आयपीएल २०२२ बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आधीच जाहीर केले होते की, आणखी दोन संघ या स्पर्धेत सामील होणार आहेत. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे आणि रिपोर्टनुसार, २५ ऑक्टोबरला दोन नवीन संघांसाठी दुबईमध्ये बोली लावली जाणार आहेत.

अनेक मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार्स आणि कंपन्यांना आयपीएलमध्ये आपला नवीन संघ उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. आता हे देखील समोर आले आहे की, आयपीएल २०२२ मध्ये कोणत्या शहरांचे संघ पाहिले जाऊ शकतात. दरम्यान, आयपीएल २०२२ च्या नवीन संघांसाठी अहमदाबाद आणि लखनऊ या शहरांची नावे समोर येत आहेत, असे आयपीएल संघ बोली प्रक्रियेच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.

आयपीएल २०२२ साठी बोली येत्या सोमवारी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. यासाठी जगभरातील अनेक व्यावसायिक दिग्गज सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. अदानी ग्रुप या प्रसिद्ध भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने अहमदाबाद येथून संघासाठी बोली लावल्याची माहिती आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील आयपीएलच्या नवीन संघांसाठी बोली लावू शकतात, असे म्हटले जात आहे. दोन सर्वोच्च बोलीदार प्रतिष्ठित स्पर्धेत दोन नवीन फ्रँचायझीचे मालक असतील.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयला बोलीदारांकडून सुमारे ७००० ते १०,००० कोटी रुपये अपेक्षित आहेत. बीसीसीआयने नवीन संघांची मूळ किंमत २००० कोटी रुपये निश्चित केली आहे. तसेच, बीसीसीआयने ३००० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना नवीन संघांसाठी बोली लावण्याची परवानगी दिली. बीसीसीआयने बोली लावणाऱ्यांची मुदत बुधवार, २० ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.

दोन नवीन संघांसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गज आहेत. या व्यतिरिक्त, हे देखील समोर येत आहे की, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील आयपीएलच्या नवीन संघांसाठी बोली लावू शकतात, कारण बीसीसीआयने परवानगी दिली आहे की, एकापेक्षा जास्त व्यक्ती देखील संघ तयार करू शकतात. दरम्यान, बीसीसीआयने आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन फ्रँचायझींसाठी धर्मशाला, गुवाहाटी, रांची, लखनौ, अहमदाबाद आणि कटक या सहा शहरांची निवड केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button