स्पोर्ट्स

सुशील कुमार रेल्वे सेवेतून निलंबित

नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला अटक झाली आहे. या कारवाईनंतर उत्तर रेल्वेने मंगळवारी सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या निलंबनाचा आदेश अबाधित राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते.

सागर धनकड हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.

उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी म्हटलं की, सुशील कुमारविरुद्ध तपास सुरु आहे. त्याला २३ मे २०२१ रोजी ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. म्हणूनच त्याच्या अटकेच्या तारखेपासून त्यांची सेवा निलंबित केली जात आहे. विशेष म्हणजे सागर धनकड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील कुमार जवळजवळ दोन आठवडे पोलिसांपासून पळत होता. पण सुशीलला मुंडका परिसरातून अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button