धोनीच्या चेन्नई संघातील गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघांना कोरोनाची लागण

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या पर्वावर कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. त्यातच आता कोरोनाने चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २ मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत. याआधी गेल्या वर्षी २०२० मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही शहरात कोरोनाचा आलेख चढता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या चिंता वाढल्या आहेत.
सध्या चेन्नई सुपरकिंग्जची टीम दिल्लीत आहे. असे म्हटले जात आहे की, विश्वनाथन, बालाजी आणि बस क्लीनरची ३ मे रोजी (आज) पुन्हा चाचणी घेण्यात आली आहे. जेणेकरुन फॉल्स पॉझिटीव्ह रिपोर्ट्सबाबतच्या शक्यता दूर होतील. या तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बायो बबलमधून बाहेर काढून १० दिवस आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे. तसेच लागोपाठ दोन वेळा कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच ते पुन्हा एकदा बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतील आणि आपल्या संघासोबत राहतील.
कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण
कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.
पॅट कमिन्स आजारी?
आयपीएल २०२१ सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी को




