Top Newsराजकारण

राज्यातील कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय १ महिना लांबणीवर

शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मात्र आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे. १ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पुन्हा १० रुपयांना मिळणार आहे.

सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०९ मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केलेली आहे. मात्र, या अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे कोविडमुळे वर्ष २०२१-२२ मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ शकणार नाही. याच कारणामुळे हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०९ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

दरम्यान, राज्य करकारने कॉलेज एका महिन्याने उशिराने सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तसा निर्णय ठाकरे सरकराने घेतला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

१ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी १० रूपयाला

कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. ३० सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे. तसेच पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली होती.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button