मुंबई : भारतीय जनता पक्षाचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओत त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कुटुंबीयांकडून आपल्याला मारहाण होत असल्याचं त्या व्हीडिओत सांगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचा व्हीडिओ ट्विट केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आपल्या कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप केला आहे. त्या सांगत आहेत की, मी पूजा… रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला धोका आहे इथे. मॅडम मला प्लीज येथून घेऊन चाल. मी विनंती करते.
वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत.पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत. @NagpurPolice@maharashtra_hmo pic.twitter.com/PHAxlD2X3F
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 8, 2021
हा व्हीडिओ शेअर करताना रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पूजाचा आत्ताचा हा व्हीडिओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहचले आहेत.
रुपाली चाकणकर यांनी पूजा यांचा अत्यंत गंभीर आरोप करणारा हा व्हिडीओ शेअर केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप खासदार रामदास तडस यांच्या कुटुंबीयांकडून प्रतिक्रिया आलेली नाही.