अर्थ-उद्योग

वापरलेल्या दुचाकींच्या मागणीमध्ये वाढ: क्रेडआर

मुंबई : भारताचा सर्वात मोठा व सर्वात विश्वसनीय टू-व्हीलर ब्रॅण्ड क्रेडआरला वापरलेल्या दुचाकींसाठी मागणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जवळपास ८० ते ९० टक्‍के विक्री व महसूल कोविड-पूर्व पातळ्यांवर परतला आहे. प्रवासी सुरक्षित व किफायतशीर प्रवास पर्यायांना प्राधान्य देत असलेल्या काळामध्ये कंपनी एण्ट्री-लेव्हल व मध्यम किंमती असलेल्या यूज्ड दुचाकी विभागांमधील मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांच्या सर्व शोरूम्समध्ये इन्वेन्टरी निर्माण करण्याकरिता त्यांची पुरवठा साखळी झपाट्याने वाढवत आहे.

क्रेडआरला लॉकडाऊन कालावधीपासून मागणीमध्ये प्रचंड वाढ होताना निदर्शनास आली आणि सणासुदीच्या काळादरम्यान देखील हा ट्रेण्ड सुरू राहिल्याचे दिसून आले. सार्वजनिक परिवहनावर निर्बंध लादण्यात आल्यामुळे लोकांनी खाजगी गतीशीलतेचा अवलंब केला आहे. लसीकरणामध्ये वाढ होण्यासोबत स्थिती सुरळीत होत असताना देखील लोकांमध्ये अजूनही गर्दीच्या ठिकाणी जाण्याबाबत संदिग्धता आहे. तसेच नुकतेच पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे कार्सऐवजी हाय मायलेज दुचाकींकडे कल वाढला आहे.

क्रेडआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ससीधर नंदिगम म्हणाले, “पूर्व-मालकीच्या किंवा सेकंड-हॅण्ड बाइक्स खरेदी करणा-या लोकांच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मागील एक वर्षामध्ये अनेक लोकांनी नोक-या गमावल्या असल्यामुळे अशा बाइक्स बहुतांश भारतीयांसाठी प्राप्‍त करण्याजोग्या व किफायतशीर आहेत. यामुळे चारचाकींच्या विक्रीमध्ये घट होऊन बाइक्ससारख्या दुचाकींसाठी मागणीमध्ये अधिक वाढ झाली आहे. लोक त्यांच्या गरजांनुसार निवड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या बाइक्सच्या व्यापक श्रेणीमुळे क्रेडआर सारख्या ऑनलाइन ब्रॅण्ड्स व लिस्टिंग व्यासपीठांकडे वळत आहेत. त्यांना सोयीसुविधा व दर्जासाठी थोडेच प्रिमिअम भरणे देखील सोईस्कर जात आहे.”

क्रेडआर दुचाकीच्या खरेदी-विक्रीच्या वेळी दर्जाचा उच्च मानक देते. कंपनी बाइकची विक्री करण्यापूर्वी १२० हून अधिक निरीक्षण व दर्जा तपासणी करते. व्यासपीठ युजर्सचे बजेट, शहर व चाललेल्या अंतरानुसार निवड करण्यासाठी बाइक्स व स्कूटर्सची व्यापक श्रेणी देते. यापेक्षाही अधिक सुविधा म्हणजे क्रेडआर बाइक खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना ६ महिन्यांची वॉरंटी व ७-डे बाय प्रोटेक्शन देखील देते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button