राजकारण
कोरोना रुग्ण सापडल्याने आमदार निवासात प्रवेश बंदी

मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासात अभ्यांगतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत कार्यकर्ते, अभ्यागत यांच्यासाठी प्रवेश बंदी असणार आहे. आमदार निवासात करोना रुग्ण आढळल्याने प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवांनी आमदार निवास व्यवस्थापनाला याबाबत पत्र दिले असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत गुरुवारी 8 हजार 646 रुग्णांची वाढ झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील आकाशवाणी आणि आमदारा निवासात राज्यभरातून लोकं येत असतात. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यातच आता कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.