आरोग्य

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप कायम; दिवसभरात २५,६८१ रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25681 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.

राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक नियमांचे कोटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगबाद अशा मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती जास्तच बिकट आहे. खबरदारी म्हणून नागपूरसाऱख्या शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. असे असूनसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.

पुणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2834 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात दिवसभरात एकूण 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुण्यात 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात दिवसभरात 808 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 229383 वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांना मिळून पुण्यात एकूण 18888 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात मृतांचा आकडा 5016 वर पोहोचला असून हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button