राजकारण

वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर जळगावला बदली

पारनेर : लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करत आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर उचलबांगडी झालीय. महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे देवरेंनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल समितीने सादर केला होता. तर, दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींत तथ्य नसल्याचं आढळून आल्यानं त्यांची जळगावला बदली करण्यात आलीय. तसा आदेश मंगळवारी (दि.१४) काढण्यात आला.

पारनेर तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना देवरे यांची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यात होता. यावरून राज्यभरात जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आमदार लंकेंनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली होती. अण्णांनीही आमदार लंकेंचं समर्थन केलं होतं.

दरम्यान, देवरेंनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत चौकशीचा आदेश देण्यात आले. दुसऱ्या बाजूला देवरेंविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. त्यात देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तर, महिला आयोगाकडील तक्रारीत तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.

या अहवालांनंतर राज्य सरकारने देवरे यांच्या बदलीचा आदेश पारित केला. त्यानुसार देवरे यांची पारनेर येथन जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आलीय. हा आदेशच कार्यमुक्ती आदेश समजावा, असेही त्यात आदेशात म्हटले आहे. त्यांच्या बदलीमुळी रिक्त पारनेरच्या जागेवर अद्याप कुणाचाही नियुक्ती झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button