राजकारण
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन.

मुंबई : सर्वसामान्य काँग्रेसचे कार्यकर्ते ते देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार अशी ओळख असणारे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे आज मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वयाच्या 63 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांची 17 मार्च रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी नांदेड हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार घेतला माञ त्यांची प्रकृती खूपच खालावली जात असल्याने त्यांना 20 मार्च बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचाराने कोरोनामुक्त झाले, परंतु प्रखर औषधीमुळे त्यांचे शरीर साथ देत नव्हते,यात फफ्फुसासह त्यांचे दोन्ही किडण्या निकामी झाल्या. त्यांना 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान इक्मो मशीन लावण्यात आले. तरीही त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नसल्याने त्यांचे निधन झाले.