Top Newsराजकारण

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘महिलाराज’; १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५० महिला

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत ५० महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या महिलांमध्ये काँग्रेसकडून उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान त्या त्यांची लढाई लढू शकतील, त्यामुळे त्यांना तिकिट देण्यात आल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसनं उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी १२५ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. १२५ उमेदवारांमध्ये ५० महिला उमेदवारांना काँग्रेसनं संधी दिली आहे. आमच्या १२५ उमेदवारांच्या यादीमध्ये ४० टक्के महिला आणि ४० टक्के तरुणवर्ग आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे आणि आम्हाला राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात करायची आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

आमच्या यादीत ज्या महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यापैकी काही पत्रकार आहेत, काही संघर्ष करत असलेल्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांना खुप अत्याचार सहन करावे लागले अशा महिलांचाही समावेश असल्याचं त्या म्हणाल्या. आम्हाला अत्याचार सहन करणाऱ्यांचा आवाज बनायचं असल्याचं सांगत उन्नाव पीडितेच्या आईलाही उमेदवारी जाहीर केली. त्या आपल्या संघर्ष पुढेही सुरू ठेवतील, ज्यांच्या मुलीसोबत अत्याचार झाला, त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यात आलं, तिच सत्ता त्यांना मिळावी म्हणून त्यांना संधी दिल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.

सीएए-एनआरसीमधील आंदोलकालाही संधी

सीएए-एनआरसी विरोधात आंदोलनात सहभागी असलेल्या सदफ जाफरचाही पक्षाच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सदफ जाफरने सीएए-एनआरसी दरम्यान खूप संघर्ष केला होता. पोस्टरमध्ये त्यांचा फोटो छापून सरकारने त्याला त्रास दिला. माझा संदेश आहे की तुमच्यावर अत्याचार होत असतील तर तुमच्या हक्कासाठी लढा. काँग्रेस अशा महिलांच्या पाठीशी आहे, असंही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button