काँग्रेस नेते नवीन जिंदल भाजपच्या वाटेवर?
पानीपत : कुरुक्षेत्र येथून दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले नवीन जिंदल यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. २००४ च्या निवडणुकीपूर्वी युवा नवीन जिंदल यांची पहिली पसंती भाजपाला होती हे खूप कमी लोकांना माहिती आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ते चाहते होते. आता नवीन जिंदल यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत
कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते. भाजपही त्यांना उमेदवारी देण्यास तयारी होती. परंतु नवीनचे वडील ओमप्रकाश जिंदल यांनी त्यांची समजूत काढली. ओमप्रकाश जिंदल त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या सांगण्यानुसार नवीन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २००९ मध्येही ते जिंकले. परंतु २०१४ मध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही. नवीन जिंदल यांनी काँग्रेसमधून लढावं अशी राहुल गांधींची इच्छा होती. परंतु त्यांच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते.
निवडणुकीच्या आधी नवीन जिंदल यांनी मतदारसंघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी राहुल गांधी यांचा कुरूक्षेत्रचा दौरा झाला. त्यांची सभा झाली. नवीन जिंदल राहुल गांधी यांच्या मंचावर गेले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय नवीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना समजवून भाजपामधून लढण्यास सांगितले. एकीकडे भावाचा आग्रह तर दुसरीकडे राहुल गांधींची इच्छा या कात्रीत नवीन जिंदल अडकले आणि त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
नवीन जिंदल हे त्यावेळी काँग्रेस सोडू शकत नव्हते. अद्यापही ते काँग्रेसमध्येच आहेत. परंतु राजकारणात सक्रीय नाहीत. त्यामुळे ते कोणत्या पक्षात आहेत त्याची चर्चाही होत नाही. नवीन जिंदल आणि भाजपाचे सुभाष चंद्रा यांच्यात वाद असल्यानेही ते भाजपासोबत गेले नाही असंही सांगितले जाते. सुभाष चंद्रा एका माध्यम समुहाचे प्रमुख आहेत. जेव्हा या दोघांमध्ये वाद झाला तेव्हा नवीन जिंदाल काँग्रेसमध्ये होते. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. २०१४ च्या निवडणुकीत नवीन जिंदल यांना हरवण्यासाठी सुभाष चंद्रा हे कुरूक्षेत्रातच वास्तव्यास होते.
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आल्या. सुभाष चंद्रा यांनी नवीनच्या आई सावित्री जिंदल यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला. सावित्री जिंदलही पराभूत झाल्या. जिंदल कुटुंबाला हा सर्वात मोठा धक्का होता. परंतु सुभाष चंद्रा यांना अपेक्षेप्रमाणे भाजपत महत्त्व मिळालं नाही. हरियाणा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांचे सुभाष चंद्रा यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. दिल्लीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांच्यावर काही गटाने हल्ला केला होता. त्यावेळी काँग्रेस हायकमांडनं मौन बाळगलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तंवर यांनी काँग्रेस सोडली. आता जिंदल-चंद्रा यांच्यात समझोता झाला आहे. यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सुभाष चंद्रा यांच्याशी झालेल्या तडजोडीनंतर आता नवीन जिंदल यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.