पंतप्रधानांच्या निवासस्थानी काँग्रेसचा कलश मोर्चा

नवी दिल्ली : काँग्रेसने दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयापासून पंतप्रधान निवासस्थानाकडे रविवारी कलश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी आंदोलनाचे 101 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 101 खेड्यांनी 100 कलश घेऊन पंतप्रधान निवासस्थानपर्यंत हा कलश मोर्चा काढण्याचा प्रयत्न किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र सोलंकी यावेळी म्हणाले की, ‘101 कलशात विविध राज्यातील माती वाहून नेण्यामागे 2014 च्या पंतप्रधानांना आठवण करून दिली पाहिजे हा उद्देश होता. पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीत ज्यात त्यांनी देशाच्या मातीबद्दल इच्छा दाखविली होती. यावेळी 3 कृषी कायदे मागे घेण्याची मागणी देखील या निमित्याने करण्यात आली.
या किसान कलश मार्चाला किसान काँग्रेसचे शेतकरी व कामगार काँग्रेस कार्यालयाबाहेर 50 मिटर अंतरावर पोलिसांनी रोखले. या परिसरात कलम १४४ च्या अंमलबजावणीमुळे किसान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊ दिले जाणार नाही, असे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले. या सर्वांना काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर थांबविण्यात आले आहे. गेल्या 101 दिवसापासून राजधानी दिल्लीच्या सीमा भागांमध्ये काँग्रेसकडून शेतकऱ्यांना आंदोलनासाठी सहकार्य केले जात आहे. मात्र, सरकारच्या तोंडावरील माशी उडत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच सिंधु बॉर्डर, गाजीपूर बॉर्डर आणि तिहेरी बॉर्डर वरती शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने तात्काळ तीनही कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी शेतकरी करत आहे. जोपर्यंत कृषी कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असे स्पष्टपणे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.