राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल निराशाजनक दावा केला आहे. ‘सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागाही जिंकू शकेल, असे मला वाटत नाही,’ असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे एका सभेला संबोधित करताना आझाद यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसची सध्याची परिस्थिती वाईट आहे. भविष्यातही आताची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ३०० जागा मिळतील, असे मला वाटत नाही. ३७० चे प्रकरण प्रलंबित आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच निर्णय घेऊ शकते. त्यामुळे मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही.

गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, फक्त तुम्हाला खूश करण्यासाठी जे आपल्या हातात नाही, त्यावर मी बोलणार नाही. मी तुम्हाला खोटी आश्वासने देणे, कलम ३७० बद्दल बोलणे योग्य नाही. लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम ३७० हटवू शकते. सरकार स्थापन करण्यासाठी ३०० खासदारांची गरज आहे. २०२४ च्या निवडणुका जिंकून आमचे ३०० नेते संसदेत पोहोचतील असे मी वचन देऊ शकत नाही. २०२४ मध्ये आम्ही ३०० जागांवर जाऊ असेही मला वाटत नाही. मी तुम्हाला कोणतेही चुकीचे वचन देणार नाही, असेही ते म्हणाले.

माझे भाषण चुकीच्या पद्धतीने दाखवले

जम्मू प्रांतातील किश्तवार जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, ओमर अब्दुल्ला यांनी आझाद यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आझाद यांनी कलम ३७० बद्दल बोलणे व्यर्थ असल्याचे म्हटले होते. त्यावर आझाद म्हणाले की, माध्यमांनी काश्मीरमधील माझ्या भाषणाचे चुकीचे चित्रण केले आणि माझ्या त्या भाषणाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. कलम ३७० वर आमची एकच भूमिका आहे, हे मी स्पष्ट करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button