Top Newsराजकारण

सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

मुंबई : महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.

राज्य सरकारने यासाठी जोर लावला होता. आता हा निर्णय आल्याने बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा करणारे शिवाजीराव अढळराव पाटील, अमोल कोल्हे यांसह राज्य सरकारमधील विविध मंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जी सशर्त परवानगी दिली आहे, त्या नियमांचे पालन होईल, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मागच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती, त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. २०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम होती. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

न्यायमूर्ती ए. एम. खानविलर आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या विशेष याचिकेवरील अंतरिम अर्जावर सुनावणी सुरू होती. २०१८ मध्ये मुंबई हायकोर्टाने दिलेल्या स्थगिती आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड विरुद्ध ए. नागराज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला. खंडपीठाने नमूद केले, की या निकालानंतर तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांनी कायद्यात दुरुस्ती करून जलिकट्टूस परवानगी द्यावी.

बैलगाडा शर्यतीवरील ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असं सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अजूनही प्राणीमित्र आपल्या मागणीवर ठाम आहेत.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली. ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या. बैलांवरील अमानुष अत्याचार थांबावेत म्हणून अशा शर्यतींवर बंदी घालण्याचीस मागणी प्राणी मित्र करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button