Top Newsराजकारण

पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्र्यांची शरद पवारांसोबत चर्चा; मंत्रिमंडळातील अन्य मंत्यांचीही उपस्थिती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांसह मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ही भेट होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांत्याच जवळपास तासभर खलबतं झाली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. मराठा आरक्षण आणि उद्याच्या मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वपुर्ण आहे.

मराठा आरक्षणावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधा कार्यालयता पंतप्रधान मोदींची भेट मागितली होती. यावर मुख्यमंत्र्यांना उद्याची म्हणजेच मंगळवारची भेट दिली आहे. यामुळे मराठा आरक्षण,कोरोना संकट, चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई, जीएसटी परतावा, ओबीसी आरक्षण अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली होती. केंद्र सरकारसोबत वाढलेला संवादातून अधिक मदतीचा अग्रह कसा धरता येईल यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा अशा अनेक विषयांवर रणनिती आखण्यात आली असल्याची चर्चा आहे. या बैठकीला काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, जीएसटी आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवर पुढील पावलांबद्दल चर्चा झाली. या बैठकीचा मुख्य मुद्दा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उद्या मुद्द्यांवर भर द्यायचा, आरक्षणासाठी केंद्रानं काय पाऊल टाकणं गरजेचं आहे, केंद्रासोबत याबाबत पुढे ही चर्चा कशी वाढवत न्यायची, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे असतील अशी माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button