आरोग्यराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मानेच्या दुखण्यामुळे एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज सकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या पथकाने तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना बुधवारी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला होता. त्यानंतर आता शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button