Top Newsराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्तांच्या पाहणीसाठी सांगली दौऱ्यावर

मुंबई : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (सोमवार) म्हणजेच दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच, येथील स्थानिकांशी चर्चा करणार आहेत.

दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण. सकाळी ९ वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी ९.५० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.५५ वा. मोटारीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण. सकाळी १०.५५ वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. सकाळी ११.०५ वा. मोटारीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण. सकाळी ११.१० वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी ११.२० वा. मोटारीने कसबे डिग्रज, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण, ११.५५ वा. कसबे डिग्रज जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी १२.०५ वा. मोटारीने मौजे डिग्रज, जिल्हा –सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.१० वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी १२.२० वा. मोटारीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.३० वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी १२.४० वा. मोटारीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.४५ वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी १२.५५ वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. दुपारी १.४५ वा. मोटारीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण. दुपारी १.५० वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी २.१५ वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी ३.३० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन, दुपारी ३.३५ वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button