राजकारण

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखिमपूर खीरीला जाण्यापासून रोखले !

लखनऊ : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीकडे जात असताना पोलिसांना त्यांना विमानतळावरच रोखलं. लखीमपूर खीरी येथील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते विमानाने लखनऊमध्ये दाखल झाले. पण, यूपी पोलिसांना त्यांना लखनऊ विमानतळातून बाहेर पडण्यापासून रोखले. त्यानंतर भूपेश बघेल विमानतळावरच जमिनीवर बसून सरकारचा निषेध केला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे बाहेर पडण्यापासून रोखल्याची माहिती दिली. या संदर्भात त्यांनी सांगितले की मला कोणत्याही आदेशाशिवाय लखनऊ विमानतळाच्या बाहेर जाण्यापासून रोखले जात आहे. विमानतळात जमिनीवर बसलेल्या बघेल यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते जमिनीवर बसलेले दिसत असून, त्यांच्या अवतीभवती यूपी पोलिस दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button