Top Newsराजकारण

काँग्रेसचे धक्कातंत्र; पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी दलित नेते चरणजितसिंह चन्नींच्या नावाची घोषणा

चंदीगड: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचं हरीश रावत यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच संध्याकाळी साडे सहा वाजता चेन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

रंधावा चर्चेत, माळ चन्नींच्या गळ्यात

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी वेगवेगळी नावं चर्चेत होती. त्यात दुपारनंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांचंच नाव सर्वाधिक चर्चेत होतं. तेच मुख्यमंत्री होतील अशी जोरदार शक्यता होती. पण काँग्रेसमध्ये होईपर्यंत काही खरं नसतं असं सांगितलं जातं. तसच पुन्हा घडलंय. कारण चरणजितसिंह चन्नी यांचं नाव फारसं चर्चेत नसताना, मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलीय. काँग्रेसच्या आमदारांसोबत बैठक केल्यानंतर चरणजितसिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली गेली.

चरणजितसिंह चन्नी हे रामदासिया ह्या शीख कम्युनिटीतून येतात. अमरींदरसिंह यांच्या मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. औद्योगीक आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ते तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि चमकूर साहीब हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१५ ते १६ साली, वर्षभरासाठी चरणजितसिंह चन्नी यांनी पंजाबचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केलेले आहे. चरणजितसिंह चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात. चरणजितसिंह हे ४८ वर्षांचे आहेत. पंजाबमध्ये दलितांची टक्केवारी ही ३० टक्क्यांच्या आसपास आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही सर्व मतं निर्णायकी ठरतील असा अंदाज बांधून चन्नींना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचं जाणकार सांगतायत.

चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील दलित चेहरा आहे. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते. नंतर ते कॅप्टन यांच्या विरोधात गेले. २०१७ मध्ये चन्नी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री बनले होते. ते स्वत: १२ वी पास आहेत. त्यामुळे वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी २०१७ मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली होती. अत्यंत साधा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दलित चेहरा आणि शीख चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चन्नी यांचा काँग्रेसला किती फायदा होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button