शिक्षण

जेईई मेन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

नवी दिल्ली : जेईई मेन्स परीक्षेच्या (JEE Main Exam) तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. पहिले ही परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार होती. मात्र आता ही परीक्षा १६ ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मार्चमध्ये होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे हॉलतिकीट गेल्या आठवड्यातच देण्यात आले आहेत. परीक्षार्थींना jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपलं अडमिट कार्ड डाऊनलोड करून घेता येऊ शकतं. या अडमिट कार्डसोबतच परीक्षार्थींना त्यांची सध्याची आरोग्यविषयक माहिती आणि दरम्यानच्या काळात केलेला प्रवास यासंदर्भातली माहितीही द्यायची आहे.

ही परीक्षा पहिले ४ दिवस घेण्याचं आयोजित होतं. मात्र आता केवळ ३ दिवसांतच परीक्षा आटोपली जाणार आहे. देश-विदेशातील विविध शहरांमध्ये ३३१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना कोविड संदर्भातील सर्व नियमांचं पालन करणं अत्यावश्यक असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button