राजकारण

सर्वांसाठी लोकल सुरु करण्यास केंद्र सरकारची अडचण नाही : रावसाहेब दानवे

मुंबई : मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही, असं सांगत आम्ही १५ ऑगस्टपासून तशीही परवानगी दिली आहे. आता जरी परवानगी मागितली तरी आमची कोणतीही अडचण नाही, आम्ही परवानगी देऊ, असं केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

मुंबई लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याच प्रश्नांना उत्तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही. कोविड आटोक्यात आल्याचं जर आम्हाला राज्य सरकारने सर्वसामान्यांना रेल्वे सुरू करण्यासाठी पत्र पाठवले तर आम्ही परवानगी देऊ, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

अनंत गीतेंच्या वक्तव्यावरही दानवेंनी भाष्य केलं. एका विशिष्ट उद्देश्याने सोबत आलेले हे तिन्ही पक्ष आहेत. त्यांचे काही तरी राजकीय प्रॉब्लेम आहेत म्हणून ते सोबत आहेत. आता अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन आणि अशाच प्रकारची वक्तव्ये करतील, अशी भविष्यवाणीही दानवेंनी केली.

सत्तेसाठी तिन्ही पक्षांनी तडजोड केलीय. अमर अकबर अ‍ॅन्थनी यांची तीन तोंडं तीन दिशेला आहे. त्यांच्या समस्या आहेत म्हणून एकत्र आहेत. हे एकमेकांवर आरोप करत राहतील आणि सत्तेसाठी एकत्रही राहतील. ते तिघे काय एकमेकांवर टीका करतात आणि कशा पद्धतीने बोलतात. असो पण मी आणि सुभाष देसाई कोणती भाषा वापरतो, कसं बोलतो, यावरून राजकीय दिशा समजून घ्या, असे सूचक संकेतही त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button