आरोग्य

कोरोना संदर्भात मजकुरातून ‘इंडियन व्हेरिएंट’ शब्द हटवा, केंद्राचा सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता भारतातील कोरोना व्हायरससाठी ‘इंडियन व्हेरिएंट’ हा शब्द वापरण्यास सोशल मीडिया कंपन्यांना बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉरमवरुन ‘इंडियन व्हेरिएंट’ हा शब्द काढून टाकावा असा आदेश केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. तशा प्रकारचे पत्र सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

‘इंडियन व्हेरिएंट’या शब्दाच्या वापरामुळे चुकीची माहिती आणि संदेश जातो, तसेच या शब्दामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे ‘इंडियन व्हेरिएंट’ या शब्दाचा वापर करु नये असा आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञाान मंत्रालयाने आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘इंडियन व्हेरिएंट’ या शब्दाचा वापर हा चुकीचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसला ‘B.1.617 व्हेरिएंट’ हा शब्द वापरला आहे. त्यांनी कुठेही ‘इंडियन व्हेरिएंट’ या शब्दाचा वापर केला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने ११ मे रोजी सांगितलं होतं की, भारतात गेल्या वर्षी कोरोनाचा B.1.617 व्हेरिएंट हा प्रकार सापडला होता. तो चिंताजनक आहे. याचाच आधार घेऊन केंद्र सरकारने या आधी सांगितलं होतं की, माध्यमांमध्ये B.1.617 व्हेरिएंटसाठी ‘इंडियन व्हेरिएंट’ हा शब्द वापरण्यात येत आहे, जो चुकीचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button