नवी दिल्ली : देशभरात आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येतही घट होताना दिसतआहे. यामुळे केंद्र सरकारतर्फे सणासुदीसाठी नियमावली जारी केली असून यंदा देखील नागरिकांना घरीच सण साजरा करण्याचे आवाहान केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात असून याचदरम्यान केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. तसेच या राज्यात गणेशोत्सव,नवरात्र सारखा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी शासनातर्फे काही नियमावली जारी केली आहे. कोव्हिड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषद घेत सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी करत नागरिकांना सूचना देखील दिल्या आहेत. डॉ. पॉल म्हणाले की, गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र आणि ईद हे सण पुढील दिवसांत येत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सण, उत्सव साजरे करण्याची गरज आहे. घरातच राहून सण साजरे करावेत. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे ही पूर्वअट आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा देखील सर्व सण समारंभ गेल्या वर्षीप्रमाणेच साजरे करावेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यापूर्वी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोनही डोस घेणे आवश्यक असून ही पूर्वअट आहे. कोरोनाचा कहर अद्याप ओसरला नसून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालण करत योग्य ती काळजी घेणे गरेजेचं आहे. गतवर्षी प्रणाणेच यंदाही संयम दाखवून गर्दी करु नेये असे आवाहन डॉ पॉल यांनी केले आहे.
आयसीएमआरचे माहासंचालक डॉ.बलराम भार्गव यांनी सुद्धा नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेणं महत्वाचे आणि गरजेचं आहे. नागरिकांनी जागरुक व्हायला हवे. त्याचप्रमाणे शहरी भागात लसीकरण योग्य रित्या होतयं मात्र ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग काहीसा मंदावला आहे. दुर्गम भागातही लसीकरण झालं पाहीजे. अद्याप देशात फक्त १६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ५४ टक्के नागरिकांचे अंशत: लसीकरण झालं आहे. ३ राज्यांमध्ये १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, अशी माहिती डॉ.बलराम यांनी दिली.