Top Newsराजकारण

शेतकऱ्यांना ‘खलिस्तानी’ म्हणणं कंगना रनौतला महागात पडणार

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना रनौतविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. खार पोलिस ठाण्यात कंगनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

कंगना रनौतनं नुकतेच इंस्टाग्रामवर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे शीख समुदायातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर अभिनेत्री कंगना रनौत विरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कंगनाने इन्साग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तिच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली. तसेच कंगनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कंगनाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार करा, अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कंगनाचे ट्विटर अकाउंट हटवण्यात आले असले तरीही ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची मतं व्यक्त करताना दिसते. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलेले, संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button