बूमिंग बुल्सद्वारे कर्मचारी भरतीची घोषणा

मुंबई : बूमिंग बुल्स अॅकॅडमी या शेअरबाजारातील प्रशिक्षण संस्थेने आज भारतातील पाच शहरांमध्ये आपल्या पाच हायब्रिड केंद्रांसाठी २० नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची घोषणा केली. दिल्ली, नोएडा, मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद या ठिकाणी स्थित प्रत्येक हायब्रिड केंद्रासाठी एकूण चार नवीन कर्मचारी नेमले जातील. ही अॅकॅडमी आपल्या पाचही केंद्रांसाठी दोन अॅडमिशन कौन्सेलर, एक सेंटर प्रमुख (व्यवस्थापक) आणि एका प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे.
बूमिंग बुल्स अॅकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिष सिंग ठाकूर म्हणाले की, आमचा उद्योग अत्यंत वेगाने वाढणारा आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्वगुण दाखवून, ज्ञान देऊन आणि आम्हाला व्यापक स्वरूपात विस्तार करण्यासाठी मदत करणारे निकाल देऊन विक्रीच्या प्रमुख कार्यांपलीकडे जाऊन प्रभाव टाकणे आवश्यक वाटते. बूमिंग बुल्समध्ये आम्ही ऑफलाइन तसेच ऑनलाइन अध्ययन अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांमधील व्यापार कौशल्ये मजबूत करण्याचे ध्येय ठेवतो. तसेच, आम्ही आमची हायब्रिड अध्ययन केंद्रे वाढवत असून यातील प्रत्येक केंद्रासाठी एक टीम नेमत आहोत.
प्रत्येक पदाच्या काही विशिष्ट जबाबदाऱ्या असतील. अॅडमिशन कौन्सेलर्सवर दूरध्वनी, इमेल आणि समोरासमोर भेटून संभाव्य विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रम यांची माहिती देण्याची जबाबदारी असेल. सेंटर प्रमुखावर (व्यवस्थापक) अनुभवी शैक्षणिक कौन्सेलर्सच्या टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. अॅडमिशन कौन्सेलर आणि सेंटर प्रमुख (व्यवस्थापक) यांच्यासोबत एक प्रशिक्षकही या टीममध्ये सहभागी होईल. भांडवली बाजारांचे उत्तम ज्ञान असण्याबरोबरच (तांत्रिक आणि मुलभूत) ते बूमिंग बुल्स एलिट ट्रेडर प्रोग्रामनुसार ट्रेडिंग आणि व्यापारासाठी नियोजन यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांची कामगिरी तपासतील. वरील जबाबदाऱ्यांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या इमेलवर आपले प्रोफाइल पाठवावे: careers@boomingbulls.com.