इतर

भांडुप मॉल आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू; चौकशीचे आदेश

मुंबई : भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेली भीषण आग अद्यापही धुमसत आहे. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेलं सनराईज रुग्णालय देखील या आगीच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयातील 10 रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील 69 रुग्णांची सुटका करण्यात आली. काही रुग्णांचा अद्यापही शोध सुरु आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने भांडुप आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अग्निशमन दलाचे 23 ते 24 बंब सध्या घटनास्थळी दाखल झालेत. मॉलमधली अनेक कार्यालय बंद अवस्थेत असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. मोठ्या प्रमाणात फर्निचरने पेट घेतल्याने परिसरात धुराचं साम्राज्य आहे. आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावे लागले आहे. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे गांधीनगर ते भांडुप एलबीएस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या दिशेने वळविण्यात आली आहे.

ड्रीम मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. त्याच मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आग लागली. त्यावेळी सुमारे 70 ते 75 रुग्ण दाखल करण्यात आलेले होते. यातील बहुतेक रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु होते.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व रुग्णांना शिडीच्या मदतीने एक-एक करून रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांना माहिती जाणून घेतली. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आमची प्राथमिकता आता आग विझविणे आहे. आग कशी लागली, त्याचे कारण काय आहे, याची चौकशी का केली जाईल. या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, आग दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button