राजकारण

उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपचा मास्टरप्लान तयार; ‘ते’ व्हीडिओ शोधले

मुंबई : शिवसेनेने भाजपाविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. त्यासाठी लागणारे व्हीडिओ देखील भाजपाने शोधले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यात भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा तापणार असल्याचं बोललं जात आहे.

तत्पूर्वी, शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यावरुन आता भाजपाने देखील तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button