राजकारण
पेपर फुटी प्रकरणात अटक केलेला संजय सानप भाजपचा पदाधिकारी
बीड : आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय शाहूराव सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पेपर फुटी प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यात याआधीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ८ जणांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून संजय सानप याची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले, संजय सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच आहे. तो बीड शहरात राहतो त्याचा मोठा बंगला आहे. संजय सानपच्या अटकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.