राजकारण

याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यायचंय; भाजपच्या खासदाराची थेट धमकी

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपताच हिंसा भडकली आहे. तृणमूल काँग्रेसकडून कार्यकर्त्यांची हत्या केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हिंसाचारावरून भाजपचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केला आहे.

बंगालमधील हिंसेवरून भाजपचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी थेट तृणमूल काँग्रेसलाच धमकावले आहे. याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि आमदारांना दिल्लीत यायचं आहे, हा इशाराच समजा, अशी उघड धमकीच वर्मा यांनी दिली आहे. थेट खासदारानेच मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना धमकावल्याने खळबळ उडाली आहे. प्रवेश सिंह वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे चिरंजीव आहेत.

निवडणुकीत जयपराजय होतच असतो. पण हत्या होत नाही. तृणमूल काँग्रेसचे गुंड बंगालच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत, असं वर्मा यांनी म्हटलं आहे. टीएमसीचे गुंडं आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करत आहेत. त्यांना मारहाण केली आहे. त्यांची वाहने तोडत आहेत. घरांना आग लावत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर बंगालचे भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीही या हिंसेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली होती. मतमोजणीनंतर भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेस प्रायोजित हल्ले होत आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला होता.

कैलाश विजयवर्गीय सध्या बंगालमध्ये आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज बंगालमध्ये येत आहेत. निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. तसेच चार हजारपेक्षा अधिक घरांवर हल्ले करण्यात आले आहेत, असं विजयवर्गीय म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button