राजकारण

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार : आ. अतुल भातखळकर

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यासोबतच प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. नितेश राणे यांच्यावरही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे, त्या मुंबई महापालिकेच्या २८८ प्रभागात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असावी? कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी? या संदर्भातील प्राथमिक बैठकही पार पडली. या बैठकीनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल हा आत्मविश्वास आपल्याला असल्याचे भातखळखर यांनी सांगितले.

या बैठकीला आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील मुद्दे, संघटना मजबूत करणे या विषयावर चर्चा झाली. नितेश राणेंवर दक्षिण-मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली असून मराठी आणि मुंबईतील कोकणी मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. कोर कमिटीच्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील ६ जागांसाठी भाजप वेगळी रणनीती आखणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपसाठी या ६ जागा प्रतिष्ठेच्या असणार आहे. या सर्व जागांवर भाजप दमदार उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.

वसुली सरकारचा रिमोट कंट्रोल ‘मातोश्री’ नव्हे, तर ‘सिल्व्हर ओक’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. पटोले यांचे वक्तव्य १०० टक्के सत्य असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्री नव्हे तर सिल्व्हर ओक असल्याचा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर हे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत असतात. राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोट शरद पवार आहेत असं नाना पटोले यांना सुचवायचे आहे का? असा सवालही अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भातखळकर यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले म्हणतायत महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचाच नाही तर राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत. असे नाना पटोले यांना सुचवायचे आहे का? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. दरम्यान पुढे भातखळकर यांनी म्हटलं आहे की, प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरात(कडी) बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झालाय असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button