राजकारण

भाजप नेत्यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र सुरूच

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर ‘भाजपा मुंबई’ने ट्विट केलं आहे. रेल्वे बंदी उठवण्याची यांची घोषणा केवळ, भाजपाच्या दणक्यामुळे. बहुधा मंदिर बंदी उठवण्यासाठी आता आणखी एक दणका द्यावा लागेल. शहाण्याला शब्दाचा मार, पण ठाकरे सरकार अतिशहाणे आहे… कुछ समझे?, असं म्हणत भाजपाने राज्य सरकारला इशारा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी मुंबईत भाजपाने विविध ठिकाणी आंदोलन केलं होतं. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आलं होतं. तसेच मनसेने देखील लोकल सुरु करण्याची मागणी केली होती.

काहींनी मंदिरे, हॉटेल, मॉल्स उघडण्याची मागणी केली. याबाबतचा निर्णय येत्या ८ दिवसांत घेण्यात येईल. उद्या टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यामध्ये आढावा घेऊन त्यांच्या सल्लामसलतीनंतर मंदिरे, मॉल उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. गर्दी टाळा, गर्दी झाल्यानं रुग्णवाढ होते, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये’; नितेश राणेंचा टोला

उद्धव ठाकरेंच्या या भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये, असं म्हणत राज्य सरकारला टोला लगावला आहे.

घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले !

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लसीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

याचबरोबर, सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!, असे दुसरे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button