उद्धव ठाकरे घराबाहेर पडले तर ती ब्रेकिंग न्यूज ठरेल; निलेश राणेंचा हल्लाबोल
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेची टीका
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.
कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. कोकण दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ई-पास काढला आहे का, असा प्रश्न त्यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारला होता. हाच धागा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणण्याची संधी साधली.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2021
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेची टीका
सद्यपरिस्थितीत पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.