राजकारण

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार : अमित शाह

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडलं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत बंगालमध्ये २०० जागा जिंकून भाजप सरकार स्थान करेल, असा दावा केला आहे. बंगालमधील पहिल्या टप्प्यातील ३० जागांपैकी २६ जागा भाजप जिंकेल, असं अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी आसाममध्ये भाजप सरकार स्थापन करेल, असा देखील दावा केला आहे. अमित शहा यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

बंगाल आणि आसामच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं. त्यासाठी मी मतदारांचे आभार मानू इच्छित आहे. मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान भाजपासाठी चांगलं लक्षण आहे. बंगालमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातीळ ३० जागांपैकी २६ जागा भाजप जिंकेल. मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान हे भाजपसाठी चांगले संकेत असून बंगालमध्ये २०० जागा जिंकून भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा अमित शहा यांनी केला. यावेळी त्यांनी आसाममध्येही भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. आसाममध्ये ४७ जागांपैकी ३७ हुन अधिक जागा भाजपला मिळतील. अधिक जागा मिळवून भाजपा सरकार स्थापन करेल, असा दावा अमित शहा यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी ७९.७९ टक्के मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. १ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button