राजकारण

कडवट शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊ शकत नाही : संजय राऊत

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मी मानतो की खरा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक इतर काही करेल परंतु बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन कधी काही करणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये एनआयएच्या ताब्याब असलेस्या सचिन वाझेंनी एका पत्राद्वारे अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी ५० कोटी खंडणी मागितल्याचे सचिन वाझेनी म्हटले आहे यावरुन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास यंत्रणांसाठी महाराष्ट्रात विरोधी पक्ष लाल गालिचे अंथरत आहेत हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी आशा प्रकारे कोंडीत पकडून सरकार अस्थिर करण्यासाठी डाव पेच अशाप्रकारे करत असतील ते यशस्वी होणार नाही. काल अजून एक पत्र आले आहे. एका पत्र लेखकाने हे पत्र लिहिले असून एनआयएच्या हाती हे पत्र आहे. हे पत्र लेखक एनआयएच्या लॉकअपमध्ये आहे. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात घडले नसेल फक्त कॅरेक्टर असासिनेशन करायचे त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करायचा आपल्या राजकीय पक्षाचे आयटी सेल वापरायचे, लॉकअपमधल्या आरोपींना पकडायचे त्यांच्याकडून काही वधवून घ्यायचे असे अनेकांच्या बाबतीत होत असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

अनिल परब, अजित पवार, अनिल देशमुख यांच्याबाबत एक पत्र काल समोर आले आहे. त्या पत्राची सत्यथा काय आहे. याबाबत कोणी सांगू शकत नाही. हे पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्म्य आहेत. त्याच्याविषयी विरोधी पक्षाने स्पष्ट करावे जेलमध्ये आणखी काही व्यक्ती असतात त्या सुद्धा तुम्हाला अडचणीत आणू शकतात हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या बाबतीत काय चालले आहे. महाराष्ट्रात या प्रकारचे दबावाचे राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. प्रत्येक परिस्थिशी सरकार बेडरपणे सामना करेल आणि संकटे परतवून लावू असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button