Top Newsराजकारण

दिशा सालियान प्रकरणात मोठे कारस्थान; भाजप आ. नितेश राणेंचा आरोप

मुंबई : ८ जूनच्या रात्री काहीच घडले नसल्याचे दाखवण्यासाठी एक मोठी रणनीती राज्य सरकारकडून आखण्यात येत आहे. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की ते स्वतःसाठीचा खड्डा खणत आहेत, असे ट्विट भाजप आ. नितेश राणे यांनी केले आहे. दिशा सालियानला अचानकपणे एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून ८ जूनच्या रात्री पार्टीतून का नेण्यात आले ? सचिन वाझेकडेही अशीच काळ्या रंगाची मर्सिडीज कार होती. ही कार आता नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी या तपास यंत्रणांकडे आहे. दीशाला नेण्यात आलेली ही तीच कार आहे का ? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. सचिन वाझेला ९ जूनला पुन्हा पोलीस दलात रूजू करून घेण्यात आले. या गोष्टीचे काही कनेक्शन आहे का ? असाही सवाल नितेश राणेंनी केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकरणकर यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्रानंतर मालवणी पोलीस ठाण्याला ४८ तासांमध्ये अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नारायण राणेंकडून दिशा सालियानच्या प्रकरणात एका महिलेची प्रतिमा वारंवार मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वारंवार बलात्काराचे आरोप करून महिलेची प्रतिमा मलीन करत असल्याची तक्रार महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत मालवणी पोलीस ठाण्याला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता नितेश राणे यांनी याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. मालवणी पोलिसांनी दिशा सालीयान प्रकरणात योग्य तपास न केल्यानेच हे प्रकरण नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. बरोबर ना ? असाही सवाल नितेश राणेंनी केला आहे. आता याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल दाखल करायला सांगितला आहे. हे किती योग्य आहे ? नक्की कोणाला वाचवण्यासाठी ही खटपट सुरू आहे ? असाही प्रश्न नितेश राणेंनी केला आहे.

याआधीही नितेश राणेंनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि दीशा सालियानच्या मृत्यूच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही अतिशय खळबळजनक असे आरोप केले होते. दिशा सालियानसोबत ज्या लोकांनी हे सगळ केले आहे त्यांना सोडणार नाही असे सुशांत सिंह म्हणाला होता. त्यानंतर सुशांत सिंहची हत्या करण्यात आली. दिशा सालियान प्रकरणत अजुनही तपास पूर्ण झाला नाही. दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या इमारतीचे कॅमेरे कसे गायब झाले ? त्याठिकाणी जे अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. दिशा सालियानच्या प्रकरणात पोस्टमॉर्टम अहवालही आला नाही. सुशांत सिंहचा मित्र भेटत नाही. तसेच दिशा सालियनच्या इमारतीचा वॉचमन गायब आहे. सोसायटीच्या नोंदवहीतील पानं गायब आहेत. हे सगळ कसे काय झालं ? आम्हाला सर्व माहिती आहे असेही राणे म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button