जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजप खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेमधील माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान, मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येतील हे निश्चित झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटीमधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघामध्ये आता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे उमेदवारी अर्ज उरले आहेत. मात्र येथून रोहिणी खडसे ह्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्या महिला राखीव मतदार संघातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भुसावळ विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमण भोळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. या ठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहेत. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारीची संधी मिळणार आहे. संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याचं दिसत आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.