Top Newsराजकारण

भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा; नारायण राणेंची जहरी टीका

७०० कोटींचे वाटप झाले नाही; मोदींकडे तक्रार करण्याची धमकी

अलिबाग : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ओबीसी आरक्षणाच्या इम्पेरिकल डाटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. ते परत डोकं वर काढत आहेत’, असा बोचरा वार नारायण राणे यांनी केला. ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन राणे यांनी हल्लाबोल केला.

नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा आज कोकणात आहे. या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षणचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे. मराठा आणि ओबीसीचा मुद्दा स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये. तुम्ही सत्तेत होता, १५ वर्षे काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, आता बस झालं तुमचं, असं नारायण राणे म्हणाले. राणे यांनी भुजबळांवर टीका केल्यावर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणे महत्वाचे आहे.

नारायण राणे म्हणाले, महापुरानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला ७०० कोटी रुपये पाठवले, आता राज्य सरकारने ते पैसे तातडीने वाटावे, अन्यथा मी परत पंतप्रधानांना सांगेन की आपली मदत वाटली गेली नाही, लोकांना मदत मिळत नाही.

आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशीर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button