Top Newsआरोग्य

भारतात २ ते १८ वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला मंजुरी

नवी दिल्ली : भारत बायोटेक कंपनीला २ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची चाचणी करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने शिफारस केली होती. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. ही क्लिनिकल चाचणी ५२५ मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही चाचणी होणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज ३ ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज २ चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहा:कार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात २ ते १८ वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ १८ वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट येणार असून या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त केली होती. तिसरी लाट आली तर लहान मुलांचं काय होणार? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या मुलांवर कशाप्रकारे उपचार होणार? आदी बाबींवर आतापासूनच विचार करण्याची गरज आहे, असं कोर्टाने केंद्राला म्हटलं होतं. तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाल्यानंतर अनेक राज्यांनी लहान मुलांसाठी स्पेशल रुग्णालय आणि कोविड सेंटर्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button