लस उत्पादक ‘भारत बायोटेक’ कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई : देशात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस मिळत नाही. याबाबत भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याच्या विविध राज्यांच्या आरोपावर कंपनीने खुलासा केलाय. कंपनीतील ५० कमर्चाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तशी माहिती भारत बायोटेकच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्विटरद्वारे दिलीय. असं असलं तरीही कंपनीत २४ तास लसीचं उत्पादन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आम्ही लसीचा पुरवठा सुरुळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. असं असतानाही काही राज्य आमच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, हे निराशाजनक आहे. आमचे ५० टक्के कर्मचारी कोरोनामुळे कामावर येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही महामारी आणि लॉकडाऊनमध्ये ३४ तास काम करत आहोत, असं ट्वीट सुचित्रा इल्ला यांनी केलंय.
https://twitter.com/SuchitraElla/status/1392192573339361282
केंद्राकडून मिळालेल्या आदेशानुसार कंपनी १ मे पासून राज्यांना लसीचा पुरवठा करत आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं की, तिसऱ्या टप्प्यात होणारी लसीची एकूण निर्मितीचा ५० टक्के हिस्सा केंद्राला तर उरलेला ५० टक्के हिस्सा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीचे निर्देश देण्यात आले आहेत.