आरोग्य

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी वाढ; मृतांची संख्याही वाढली !

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ६ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात ३७ हजार ८७५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३६९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३० लाख ९६ हजार ७१८ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २२ लाख ६४ हजार ५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ४१ हजार ४११ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ३ लाख ९१ हजार २५६ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ७० कोटी ७५ लाख ४३ हजार १८ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button