राजकारण

बीड जिल्हा बँकेच्या मतदानादरम्यान भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान परळी मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रावरच भिडले. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मतदान केंद्रावर पोहोचल्या. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. चार वाजल्यानंतरही मतदान सुरु असल्याने तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

काहीही कारण नसताना आमचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्यात आले. सरकारकडून हा आमच्यावर अन्याय आहे. कोरम पूर्ण होण्यासाठी ही उमेदवार संख्या ठीक नाही, त्यामुळे नैसर्गिक प्रशासक येणे हे ठीक आहे. मात्र बँकेवर प्रशासन बसवण्याचं कारस्थान सत्ताधारी पक्षाचं आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. पळपुटेपणा हा सरकारी पक्षाने केला आहे. ही निवडणूक होऊ नये यासाठी सहकार मंत्र्यांकडून दबाव आणण्यात आला. पळपुटेपणा सत्ताधारी करत आहेत. एवढी चांगली चाललेली बँक, हिच्यावर प्रशासक आणण्याची वेळ आणली. सरकारचा गैरवापर त्यांनी केला आहे, असा घणाघाती आरोप पंकजा मुंडेंनी केला.

त्यांची सत्ता सीमा ही परळी आहे. त्यांना दोन जागेवर उमेदावर मिळाले नाहीत. पराभव आणि यश चालत असते. पराभवाला अनेक मोठ-मोठे लोक सामोरे गेले आहेत. पराभवाचा संबंध अब्रूशी लावू नये. ही चुकीची विचारसरणी आहे, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येता येणार नाही म्हणून प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे. जीवनामध्ये मी लढाई नेहमी अकॅडमीक लढते. सत्ताधारी पक्ष लढाईला सामोरे जात नाही. मतदान बोगस केलं जातंय, असा आरोपही पंकजांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button