ड्रग्स माफियांच्या तालावर ठाकरे सरकारचा डान्स : भातखळकर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो आणि कागदपत्रांचे फोटो ट्विट करुन एकच खळबळ उडवूवन दिली आहे. नवाब मलिक यांनी पहचान कौन असं म्हणत वानखेडे यांचा पहिल्या लग्नातील फोटो ट्विटरवर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी वानखेडे यांच्या जन्म दाखलाचा फोटो शेअर करत इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप केलाय. यात समीर वानखेडे यांचं नाव समीर दाऊन वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख केलाय. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर घणाघाती टीका केलीय.
एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पातळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 25, 2021
एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पाताळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे, अशी खोचक टीका भातखळकर यांनी मलिकांच्या आरोपांवर केली आहे.
NCB चे डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे.
वानखेडे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा खोडसाळ दावा केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे बनविणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल FIR दाखल करावा… pic.twitter.com/KYRx1K2eeR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 25, 2021
त्याचबरोबर ‘एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा खोडसाळ दावा केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे बनविणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल गुन्हा दाखल करावा’, अशी मागणीही भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीय.