‘आप’चे खा. संजय सिंह यांच्या घरावर हल्ला
माझी हत्या झाली तरी चालेल, पण प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही !
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी राममंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळ्यांचा आरोप केला आहे. संजय सिंह म्हणाले की, ट्रस्टने दोन कोटी रुपयांची जमीन १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली होती. दोन्ही देवघेव पाच मिनिटांत केली गेली, असाही त्यांचा दावा आहे. यानंतर आता संजय सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल, असं संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. संजय सिंह यांचा दावा आहे की, राममंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या इशाऱ्यावर देवाण-घेवाण केली गेली होती. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय रजिस्ट्रीचे साक्षीदार होते, असे सांगून सिंह यांनी या व्यवहाराची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी केली.
मेरे घर पर हमला हुआ है।
कान खोलकर सुन लो भाजपाइयों चाहे जितनी गुंडागर्दी कर लो प्रभु श्री राम के नाम पर बनने वाले मंदिर में चंदा चोरी नही करने दूँगा।
इसके लिए चाहे मेरी हत्त्या हो जाय।— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 15, 2021
संजय सिंह म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या नावावर इतका मोठा घोटाळा ऐकून तर पायाखालची जमीन निसटून जाईल. हा देशातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेवर आघात आहे.
कल से आज तक मिली धमकियों के सबूत के साथ @DelhiPolice को सूचना। pic.twitter.com/PvPd88RSxc
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 15, 2021