ओवेसींच्या गाडीवरील हल्ला ध्रुवीकरणासाठी; काँग्रेस, समाजवादी पक्षाचा हल्लाबोल
मला झेड प्लस सुरक्षा नको : ओवेसी

नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, पराभवाच्या भीतीने भाजपा ध्रुवीकरणाच्या प्रयत्नात आहे. सपाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी म्हणाले की, हे काम एका व्यक्तीचे नाही. यामागे मोठे कारस्थान आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. भाजपाकडे इशारा करून ते म्हणाले की, गोळीबारामागे ध्रुवीकरणाचा हेतू स्पष्ट दिसत आहे.
मला झेड प्लस सुरक्षा नको : ओवेसी
एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरूवारी गोळीबार करण्यात आला. हापूर जिल्ह्यातून प्रचारसभेहून परतत असताना त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर ओवेसींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच ही सुरक्षा संपूर्ण देशभरात दिली जाणार असल्याचे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मला झेड प्लस सुरक्षा नको आहे. तसेच मला घुटमळत आयुष्य जगायचं नाहीये. मला फक्त न्याय हवाय, असं वक्तव्य ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत केलंय.
ओवेसी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना धन्यवाद म्हटलं आहे. कारण बिर्ला यांनी फोनकरून ओवेसी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. हे लोकं कोण आहेत, जे गोळ्यांवर विश्वास ठेवतात परंतु बॅलेट पेपरवर नाही. हे लोकं इतके कट्टरवादी झाले असून यांचा संविधानावार विश्वास का नाहीये, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित लोकसभेत उपस्थित केला.
टोल नाक्यावर गाडी उभी असेल आणि यांसारखी अज्ञात लोकं चार गोळ्या झाडतील, अशा पद्धतीचं राजकारण कसं चालणार?, असे ओवैसी म्हणाले. हे युवा कोणतं पुस्तक वाचून कट्टरवादी झाले आहेत. यांसारखी लोकं कट्टरपंथीय झाल्यामुळे उजव्या विचारसरणीचा साम्यवाद आणि दहशतवाद वाढेल, एनडीए-१ ने जी चूक केली. तीच चूक आता तुम्ही परत करणार आहात का, यामुळे देशाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. असं ओवेसी म्हणाले.
फसबुकवरील क्रिकेट मॅटवर टीका केल्यास यूएपीए का लागू होत नाहीये. त्याच्यावर यूएपीए लावला जाणार नाही का ही गोष्ट मी सरकारकडे सोपवतो. मला मृत्यूची भिती वाटत नाही. मला मला झेड प्लस सुरक्षा नकोय. मला अ वर्गाचा नागरिक बनवा. मी गप्प बसणार नाही. तसेच मला घुटमळत आयुष्य जगायचं नाहीये. मला न्याय हवाय, अशा प्रकारचं आवाहन ओवेसी यांनी लोकसभेत केलं आहे.