राजकारण
आशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात अली आहे. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सध्या न्यायालयाने मिश्रा याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला शनिवारी (९ ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं.
शनिवारी त्याची जवळपास १२ तास चौकशी करण्यात आली होती. मात्र,“अनेक तासांपासून सुरु असलेल्या चौकशीत आशिष मिश्राने सहकार्य केलं नाही. तो अनेक गोष्टी सांगू इच्छित नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डीआयजी उपेंद्र यादव दिली होती. पोलिसांनी आशिष मिश्रा याच्याविरोधात खून, गुन्हेगारी कट, बेपर्वाईने ड्रायव्हिंग करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.