
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला २० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर २० ऑक्टोबरला निर्णय होणार आहे. सुनावणी पूर्ण केल्यानंतर कोर्टाने निर्णय ठेवला राखून आहे.
आर्यन शाहरुख खानच्या जामीन अर्जावर आजही निर्णय झाला नाही. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तसेच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी विरोध केला. दुपारी एक वाजल्यापासून एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु होता. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपाला निकाल राखून ठेवला आहे.
न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजून ऐकून घेतल्या. दरम्यान, पुढचे पाच दिवस न्यायालयाला सुट्ट्या आहेत. यामध्ये ईद, दसरा तसेच शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्या आहेत. त्यामुळे आर्यन खानला आपला सहा दिवस कोठडीतच काढावे लागणार आहेत.



