अर्थ-उद्योग

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड आणि महिंद्र अँड महिंद्र लिमिटेडच्या एकत्रीकरणाला तत्वतः मान्यता

मुंबई – महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या (एम अँड एम) संचालक मंडळाने कंपनीच्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या स्टेप डाउन उपकंपनीचे कंपनीमधे (एमईएमएल) एकत्रीकरण करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.

– एकत्रीकरणामुळे ईव्ही कामकाज दोन गटांत विभागले जाणार आहे – लास्ट माइल मोबिलिटी (एलएमएम) आणि इलेक्ट्रिक व्हेइकल टेक सेंटर,

– आराखडा सुलभीकरणामुळे नाविन्य, गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी, कार्यक्षमता आणि व्यापक अर्थव्यवस्था यांच्या माध्यमातून सुधारणा घडून येईल. त्याशिवाय समभागधारकासाठीचे मूल्य खुले होईल.

– विकास आणि अंमलबजावणीला चालना मिळावी यासाठी एलएमएम विभागाला लास्ट माइल मोबिलिटीसाठी संपूर्ण मालकी पुरवली जाईल.

– ईव्ही टेक सेंटरला एम अँड एमच्या एमआरव्ही, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील उत्पादन विकास क्षमतेच्या व्यापक यंत्रणेद्वारे स्त्रोत आणि ताळमेळ यांची जोड दिली जाईल.

महिंद्रा ही इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील प्रवर्तक कंपनी आहे. कंपनीचा दोन दशकांपासून चालत आलेला ईव्हीचा प्रवास ‘बिजली’पासून सुरू झाला होता आणि त्याला निर्विवादपणे भारतातील पहिल्या व्यावसायिक आणि रस्त्यावर चालण्यायोग्य इलेक्ट्रिक वाहनाचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापासूनच कंपनीच्या व्यवसायिक आणि प्रवासी वाहन व्यवसायाबरोबरच ईव्हीचाही महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय रस्त्यांवर 32,000 महिंद्रा ईव्ही असून त्यांनी 270 दशलक्ष किलोमीटर्स अंतर पार केले आहे. फ्रेंच अध्यक्षीय ताफ्यामधे प्युजिऑट इलेक्ट्रिक दुचाकीसह समाविष्ट होण्यापासून महिंद्रा त्रेओसह महिला उद्योजकांचा नवा ग्राहक वर्ग तयार करण्यापर्यंत आणि फॉर्म्युला ई रेसपर्यंत महिंद्राद्वारे ग्राहक आणि भागिदारांना ईव्हीची अनोखी श्रेणी उपलब्ध करून दिली जाते.

इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय बदलाच्या वळणावर येऊन ठेपलेला असून त्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ घातला आहे. या पुनर्रचनेमुळे आवश्यक स्त्रोतांचा पुरवठा करणे तसेच इच्छित विकास साधण्यासाठी दिशा देणे शक्य होणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरकर म्हणाले, ‘इलेक्ट्रिक वाहने हे वाहन व्यवसायाचे भविष्य आहे. भविष्यासाठी सज्ज होण्यासाठी आमच्या मते ईव्ही हा मुख्य व्यवसायाचा भाग असायला हवा. एकत्रीकरणाचा निर्णय हा आमच्या ईव्ही धोरणाचा भाग असून ई- मोबिलिटी लोकप्रिय करण्यासाठी विविध क्षेत्रांचे विद्युतीकरण करण्याचे ध्येय आहे. यापुढेही ईव्ही क्षेत्रात आकर्षक नवी उत्पादने उपलब्ध करण्यासाठी आम्ही ग्राहकांच्या गरजांचे सखोल आकलन करून घेत राहू.’

गेल्या काही काळात अतिशय वेगाने भारतातील ईव्ही क्षेत्राचा विकास झाला असून यापुढेही तो असाच होत राहील. ईव्ही हे केवळ किंमतीच्याच बाबतीत नव्हे, तर शाश्वततेच्या दृष्टीनेही वाहन क्षेत्राचे भवितव्य आहे. एम अँड एमद्वारे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, फ्लीट मोबिलिटी, वैयक्तिक प्रवास आणि संशोधन व विकास यांसह संपूर्ण ईव्ही यंत्रणेवर लक्ष केंद्रित करत असून त्यामुळे तंत्रज्ञान आणि नाविन्यासह विकासाला चालना मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button