आरोग्य

‘रोश’च्या अँटीबॉडी ‘कॅसिरिविमॅब,’ ‘इमदेवमॅब’च्या आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान सेंट्रल ड्रग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशन अर्थात CDSCO ने स्विर्त्झलँडची फार्मा कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेलच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. रोश (Roche) आणि रेजेनरॉन (Regeneron) यांनी एकत्रित विकसित केलेल्या अँटिबॉडी-ड्रग कॉकटेल कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इमदेवमॅब (Imdevimab) च्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

रोश कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं की, भारतात कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इमदेवमब (Imdevimab) यांना मान्यता दिलेली आहे. अमेरिका आणि युरोपियन संघ येथील आपत्कालीन वापरासाठीचा डेटा आणि युनियनमध्ये मानवी वापरासाठी औषधी उत्पादनांच्या वैज्ञानिक समितीच्या अभिप्रायांच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की हे कॉकटेल प्रौढ आणि लहान मुलांना (१२ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वजन कमीतकमी ४० किलो) सौम्य आणि मध्यम कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते. भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची रुग्णालयात दाखल करणे कमी होणे आणि आरोग्य सेवेवरील दबाव कमी करण्यासाठी रोच वचनबद्ध आहेत, असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button